मधुमेहावर पुण्यातील शास्त्रज्ञांचे महत्वाचे संशोधन

मधुमेहींच्या पोटातील सूक्ष्मजीवांमध्ये झालेले बदल अभ्यासण्यात यश   ‘संशोधन’ प्रतिनिधी: ५ फेब्रुवारी २०१७ ———- देशाच्या आरोग्यासमोरील मोठे आव्हान असणाऱ्या मधुमेहाचे नेमके कारण शोधून त्यावर परिणामकारक उपचार शोधण्याच्या दिशेने पुण्यातील शास्त्रज्ञांनी महत्वाचा टप्पा गाठला आहे. या संशोधनातून मधुमेह झालेल्या रुग्णांच्या पोटातील सूक्ष्मजीवांमध्ये होणारे बदल अभ्यासण्यात आले आहेत. मधुमेह झाल्यावर निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांवर नेमके उपचार यामुळे शक्य होणार असून, भारतीयांना होणाऱ्या मधुमेहाच्या कारणांचाही मागोवा घेता येणार…

भारतीय विद्यार्थी घेणार गुरुत्वीय लहरींचा वेध 

आयसरच्या विद्यार्थ्यांना लायगोमध्ये संशोधनाची संधी ‘संशोधन’ प्रतिनिधी: ५ फेब्रुवारी २०१७  ———- गुरुत्वीय लहरींचा वेध घेणाऱ्या लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हीटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरीच्या (लायगो) दोन जुळ्या वेधशाळांमध्ये प्रत्यक्ष संशोधन करण्याची संधी भारतीय विद्यार्थ्यांना मिळणार आहे. भारतातील आगामी लायगो वेधशाळेच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पासाठी आवश्यक मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी लायगोच्या शास्त्रज्ञांनी पुढाकार घेतला आहे. या अंतर्गत आयसर- पुणेच्या निवडक विद्यार्थ्यांना वर्षभर लायगोच्या अमेरिकेतील वेधशाळांमध्ये संशोधन प्रकल्प करण्याची संधी दिली…