मंगळाभोवती हजार दिवस

मंगळयानाचा नवा विक्रम संशोधन रिपोर्ट; १९ जून २०१७ भारताच्या मंगळयानाने मंगळाभोवती आपला हजार दिवसांचा कार्यकाळ सोमवारी (१९ जून) पूर्ण केला. पहिल्याच प्रयत्नात मंगळावर यशस्वीपणे मोहीम पाठवून २४ सप्टेंबर २०१४ रोजी भारताने इतिहास रचला होता. आतापर्यंतची सर्वात कमी खर्चाची मंगळ मोहीम असणाऱ्या मार्स ऑर्बायटर मिशनने मंगळाभोवती हजार दिवस पूर्ण करून आणखी एक विक्रम केला आहे. या कालावधीत मंगळयानाने…

सात ग्रहांच्या ‘पृथ्वीमालेचा’ शोध

ट्रॅपिस्ट-१ ताऱ्याभोवती जीवसृष्टीची शक्यता ; नासाची पत्रकार परिषदेत घोषणा संशोधन रिपोर्ट; २३ फेब्रुवारी २०१७ आकाशात एक असा तारा आहे, ज्याच्या भोवती एक – दोन नव्हे तर चक्क सात पृथ्वीसदृश ग्रह फिरत आहेत. आश्चर्यकारक वाटणारा हा शोध बुधवारी (२२ फेब्रुवारी २०१७) नासाने जाहीर केला. ‘ही ‘पृथ्वीमाला’ आपल्यापासून ३९ प्रकाशवर्षे दूर असून, सूर्यापेक्षा अतिशय लहान, थंड आणि तरुण ताऱ्याभोवती…

येत्या १५ फेब्रुवारीला होणार अवकाश विक्रम ! 

इस्रो करणार एकाच वेळी १०४ उपग्रहांचे प्रक्षेपण  संशोधन प्रतिनिधी: ७ फेब्रुवारी २०१७ —- भारतातर्फे अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात लवकरच एक जागतिक विक्रम केला जाणार आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात भारतीय अवकाश संशोधन संस्थेतर्फे (इस्रो) एकाच वेळी तब्बल १०३ उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात येणार असून, त्यातील १०० उपग्रह विदेशी असणार आहेत. इस्रोच्या भरवशाच्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाद्वारे (पीएसएलव्ही सी ३७) हा विक्रम साधला जाणार…

मंगळयानाचा कार्यकाळ आणखी वाढला 

ग्रहणावस्था टाळण्यासाठी यानाची कक्षा बदलण्यात इस्रोला यश  संशोधन प्रतिनिधी: ५ फेब्रुवारी २०१७ ———- भारताच्या मार्स ऑर्बायटर मिशनला (मॉम) आणखी कार्यकाळ देण्यात भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) शास्त्रज्ञांना यश आले आहे. सप्टेंबर २०१७ पर्यंत मंगळयान रोज सुमारे आठ तास मंगळाच्या सावलीतून (ग्रहणावस्थेतून) प्रवास करणार होते. यामुळे यानाला सौरऊर्जा मिळण्यात अडथळा निर्माण होणार होता. यान मंगळाच्या सावलीच्या भागातून प्रवास करणार नाही अशा रीतीने…