सात ग्रहांच्या ‘पृथ्वीमालेचा’ शोध

ट्रॅपिस्ट-१ ताऱ्याभोवती जीवसृष्टीची शक्यता ; नासाची पत्रकार परिषदेत घोषणा संशोधन रिपोर्ट; २३ फेब्रुवारी २०१७ आकाशात एक असा तारा आहे, ज्याच्या भोवती एक – दोन नव्हे तर चक्क सात पृथ्वीसदृश ग्रह फिरत आहेत. आश्चर्यकारक वाटणारा हा शोध बुधवारी (२२ फेब्रुवारी २०१७) नासाने जाहीर केला. ‘ही ‘पृथ्वीमाला’ आपल्यापासून ३९ प्रकाशवर्षे दूर असून, सूर्यापेक्षा अतिशय लहान, थंड आणि तरुण ताऱ्याभोवती…

मधुमेहावर पुण्यातील शास्त्रज्ञांचे महत्वाचे संशोधन

मधुमेहींच्या पोटातील सूक्ष्मजीवांमध्ये झालेले बदल अभ्यासण्यात यश   ‘संशोधन’ प्रतिनिधी: ५ फेब्रुवारी २०१७ ———- देशाच्या आरोग्यासमोरील मोठे आव्हान असणाऱ्या मधुमेहाचे नेमके कारण शोधून त्यावर परिणामकारक उपचार शोधण्याच्या दिशेने पुण्यातील शास्त्रज्ञांनी महत्वाचा टप्पा गाठला आहे. या संशोधनातून मधुमेह झालेल्या रुग्णांच्या पोटातील सूक्ष्मजीवांमध्ये होणारे बदल अभ्यासण्यात आले आहेत. मधुमेह झाल्यावर निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांवर नेमके उपचार यामुळे शक्य होणार असून, भारतीयांना होणाऱ्या मधुमेहाच्या कारणांचाही मागोवा घेता येणार…