मंगळाभोवती हजार दिवस

मंगळयानाचा नवा विक्रम संशोधन रिपोर्ट; १९ जून २०१७ भारताच्या मंगळयानाने मंगळाभोवती आपला हजार दिवसांचा कार्यकाळ सोमवारी (१९ जून) पूर्ण केला. पहिल्याच प्रयत्नात मंगळावर यशस्वीपणे मोहीम पाठवून २४ सप्टेंबर २०१४ रोजी भारताने इतिहास रचला होता. आतापर्यंतची सर्वात कमी खर्चाची मंगळ मोहीम असणाऱ्या मार्स ऑर्बायटर मिशनने मंगळाभोवती हजार दिवस पूर्ण करून आणखी एक विक्रम केला आहे. या कालावधीत मंगळयानाने…

सात ग्रहांच्या ‘पृथ्वीमालेचा’ शोध

ट्रॅपिस्ट-१ ताऱ्याभोवती जीवसृष्टीची शक्यता ; नासाची पत्रकार परिषदेत घोषणा संशोधन रिपोर्ट; २३ फेब्रुवारी २०१७ आकाशात एक असा तारा आहे, ज्याच्या भोवती एक – दोन नव्हे तर चक्क सात पृथ्वीसदृश ग्रह फिरत आहेत. आश्चर्यकारक वाटणारा हा शोध बुधवारी (२२ फेब्रुवारी २०१७) नासाने जाहीर केला. ‘ही ‘पृथ्वीमाला’ आपल्यापासून ३९ प्रकाशवर्षे दूर असून, सूर्यापेक्षा अतिशय लहान, थंड आणि तरुण ताऱ्याभोवती…