शंभर कोटींचे ‘नोबेल’ 

मयुरेश प्रभुणे  वैज्ञानिक घोषणा करण्याचे हक्काचे व्यासपीठ असणाऱ्या इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये यावर्षीही एक घोषणा झाली. केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या बहुतांश निधीवर चालणाऱ्या वार्षिक वैज्ञानिक मेळाव्यात यंदा मात्र, बाजी मारली ती आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी. ‘आंध्र प्रदेशमधील जो शास्त्रज्ञ नोबेल पारितोषिक जिंकेल त्याला राज्य सरकारतर्फे १०० कोटींचे बक्षिस दिले जाईल,’ अशी घोषणा चंद्राबाबू यांनी तिरुपती येथे पार पडलेल्या १०४…

उत्तराखंडमध्ये ५.६ तीव्रतेचा भूकंप

गौंधार – मध्यमाहेश्वरजवळ जमिनीखाली १४.२ किलोमीटरवर भूकंपाचे केंद्र संशोधन प्रतिनिधी: ७ फेब्रुवारी २०१७ —- सलग ३० सेकंद बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यांनी राजधानी दिल्लीसह उत्तर भारत सोमवारी रात्री (६ फेब्रुवारी) हादरला. उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गौंधार – मध्यमाहेश्वर जवळ जमिनीखाली १४.२ किलोमीटरवर भूकंपाचे केंद्र असल्याचे युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हेने (यूएसजीएस) म्हटले आहे. यूएसजीएसच्या नोंदींनुसार भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केल वर ५.६ असून, भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या…

येत्या १५ फेब्रुवारीला होणार अवकाश विक्रम ! 

इस्रो करणार एकाच वेळी १०४ उपग्रहांचे प्रक्षेपण  संशोधन प्रतिनिधी: ७ फेब्रुवारी २०१७ —- भारतातर्फे अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात लवकरच एक जागतिक विक्रम केला जाणार आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात भारतीय अवकाश संशोधन संस्थेतर्फे (इस्रो) एकाच वेळी तब्बल १०३ उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात येणार असून, त्यातील १०० उपग्रह विदेशी असणार आहेत. इस्रोच्या भरवशाच्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाद्वारे (पीएसएलव्ही सी ३७) हा विक्रम साधला जाणार…

मंगळयानाचा कार्यकाळ आणखी वाढला 

ग्रहणावस्था टाळण्यासाठी यानाची कक्षा बदलण्यात इस्रोला यश  संशोधन प्रतिनिधी: ५ फेब्रुवारी २०१७ ———- भारताच्या मार्स ऑर्बायटर मिशनला (मॉम) आणखी कार्यकाळ देण्यात भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) शास्त्रज्ञांना यश आले आहे. सप्टेंबर २०१७ पर्यंत मंगळयान रोज सुमारे आठ तास मंगळाच्या सावलीतून (ग्रहणावस्थेतून) प्रवास करणार होते. यामुळे यानाला सौरऊर्जा मिळण्यात अडथळा निर्माण होणार होता. यान मंगळाच्या सावलीच्या भागातून प्रवास करणार नाही अशा रीतीने…